२० एप्रिलनंतरही जिल्हाबंदी कायमच, जिल्हा ओलांडून यायला परवानगी नाहीः मुख्यमंत्री ठाकरे

0
762
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील लॉकडाऊनमध्ये २० एप्रिलनंतर काही प्रमाणात शिथिलता आणत असलो तरी जिल्ह्याच्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. जिल्हा ओलांडून यायला परवानगी दिलेली नाही. किमान ३ मे पर्यंत हे बंधन आहे. मला अत्यवश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, माल यांची वाहतूक करायची आहे. व्हायरस ची वाहतूक करायची नाही  २० तारखेपासून आपल्याला हे रुतलेले अर्थचक्र फिरवायचे आहे. त्यामुळे काही निवडक ठिकाणी माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी लाइव्ह प्रसारणाद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांचा खुलासा केला. काही जिल्हे शून्य रुग्णाचे आहेत. काही ठिकाणी घट झाली आहे. रेड झोन, ऑरेंज, ग्रीन असे झोन केले आहेत. काही निवडक ठिकाणी आम्ही माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देत आहोत. जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी घेत असला, त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करीत असाल तर मान्यता मिळेल. शेती आणि कृषी, जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत अडथळा येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उद्या महाराष्ट्रात कोरोनाविरुद्धचे युद्ध सुरू होऊन सहा आठवडे होतील. शत्रू दिसत असता तर हिंदुस्थानी जनतेने एक घाव घालून दोन तुकडे केले असते. मात्र हा अदृश्य शत्रू आहे. आपल्याच माणसाच्या माध्यमातून वार करतो. आपण जिद्दीने लढतो आहोत.  काल संध्याकाळच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत आपण ६६ हजार ८०० टेस्ट केल्या त्यापैकी किमान ९५ टक्के निगेटिव्ह ३६०० पॉझिटिव्ह आहेत.  समाधान हे आहे की, ७५ टक्के अति सौम्य लक्षणे असलेले आहेत. ५२ रुग्ण गंभीर असून गंभीर रुग्णांना वाचवणे याकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे ठाकरे म्हणाले. या लॉकडाऊन कालावधीत घराघरात महिलांवरील अत्याचार होता कामा नये, असे होत असेल तर महिलांना मी विनंती करतोय तर १०० नंबर फिरवा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा