कोरोनाग्रस्तांची वाढती संख्याः मुख्यमंत्री आज करणार मंत्र्यांशी लॉकडाऊन वाढवण्यावर चर्चा?

0
421
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत चालली असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज त्यांच्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. या चर्चेत राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या मुद्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. आज लॉकडाऊनचा १४ दिवस असून त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत.

राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ८६८ झाली आहे. तर ५२ जणांचा कोरोना विषाणुने बळी घेतला आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीच उपाय म्हणून महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही आठवडे वाढवणाऱ्यावर या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा