भारतात २४ तासांत २९०० कोरोना पॉझिटिव्ह, १२६ रुग्णांचा मृत्यू; जगभर थैमान सुरूच

0
152
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशभरात गेल्या २४ तासांत २९०० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, तर १२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. रूग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे तर त्या खालोखाल गुजरातचा क्रमांक आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत चाललेली संख्या ही आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरू पहात आहे.

देशः देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४९, ३९१ झाली असून आतापर्यंत १ हजार ६९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक १५ हजार ५४१, गुजरातमध्ये ६ हजार २४५, दिल्लीत  ५ हजार १०४, तामिळनाडूत ४ हजार ५८, राजस्थानात ३ हजार १५८, मध्य प्रदेशात ३ हजार ४९ तर उत्तर प्रदेशात २ हजार ८८० एवढी झाली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर तेलंगण सरकारनेही २९ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे.

दुनियाः जगभरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३७ लाख २७ हजार ९३७ झाली आहे तर २ लाख ५८ हजार ३४४ हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. जागतिक महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेत १२ लाख ३७ हजार ६३३ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर ७२ हजार २७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये २२ हजार ५५० लोक कोरोना संक्रमित झाले आहेत आणि ५२६ लोक मृत्युमुखी पडले आहेत. स्पेनमध्ये कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ५० हजार ५६१ वर पोहोचला आहे. तेथे २५ हजार ६१३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये २ लाख १३ हजार १३ लोक कोरोना संक्रमित असून २९ हजार ३१५ लोक आतापर्यंत प्राणास मुकले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या इटलीपेक्षाही जास्त आहे. ब्रिटनमध्ये १ लाख ९४ हजार ९९० लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून आजवर २९ हजार ४२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा