औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म, बाळ आणि बाळंतीणही सुरक्षित

0
84
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ३० वर्षीय महिलेची  सुरक्षित प्रसुती करण्यात चिकलठाणा येथील विशेष कोरोना रूग्णालय म्हणजेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. प्रारंभी सिझेरियन करायला विरोध करणाऱ्या या महिलेची आज सिझेरियन करून यशस्वी प्रसुती करण्यात आली. एखाद्या कोरोनाग्रस्त महिलेची अशा प्रकारे प्रसुती करण्याची ही जगातील पाचवी आणि भारतातील दुसरीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

औरंगाबादच्या बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय तरूण मुंबईहून अॅम्बुलन्सने आपले कुटुंब घेऊन औरंगाबादेत पोहोचला होता. आधी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याची आई असलेली ही ३० वर्षीय गर्भवती महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. एकीकडे कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत असतानाच या महिलेची प्रसुती करण्याचेही मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. प्रारंभी ही महिला सिझेरियन प्रसुती करण्यासाठी विरोध करत होती. त्यामुळे डॉक्टरांनी शुक्रवारपर्यंत तिच्या सामान्य बाळंतपणासाठी प्रयत्न करून पाहिले.

आज अखेर तिचे सिझेरियन बाळंतपण करण्याचा निर्णय झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्रीरोज तज्तज्ञ डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. कविता जाधव, डॉ. पी. एम. कुलकर्णी, भारती नागरे, डॉ. सुरेखा ढेपले, डॉ. ज्योती दारवंटे या डॉक्टरांच्या पथकाने पथकाने शर्थीचे प्रयत्न करून या महिलेची प्रसुती यशस्वी केली. बाळ आणि बाळांतीण दोघेही सुखरूप आहेत. जन्मावेळी बाळाचे वजन सव्वातीन किलो भरले आहे. जन्मानंतर या नवजात मुलीच्या स्वॅबचे तीन नमुनेही घेण्यात आले असून ते चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा