ठाकरे सरकारमधील ‘त्या’ कोरोना बाधित ज्येष्ठ मंत्र्यांना उपचारासाठी मुंबईला हलवले

0
2106

औरंगाबादः महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील कोरोना बाधित आढळलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांना आज उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. या मंत्र्यांचा स्वॅब तपासणीचा अहवाल काल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले हे मंत्री विधान परिषद निवडणुकीनिमित्त दोन आठवडे मुंबईत होते. विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर याच आठवड्यात ते आपल्या जिल्ह्यात परतले होते. या मंत्र्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा बाधा झाली आहे. त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे या मंत्र्यांनाही संसर्ग झाला आहे. आज सकाळी विशेष ऍम्बुलन्सने या मंत्र्यांना नांदेडहून पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

हेही वाचाः ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते!

कोरोनाची बाधा झालेले हे महाविकास आघाडी सरकारमधील दुसरे मंत्री आहेत. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर ते बरे होऊन घरी परतले असून सध्या ते एक महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीवर आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा