लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह ठाणे, पुण्यात चाइल्ड पोर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ

0
364
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईसह ठाणे आणि पुण्यातही चाइल्ड पोर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती एका निरीक्षणात उघड झाली आहे. त्यामुळे या शहरांतील लहान मुलांच्या जीवाला व सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे भारतीय बाल संरक्षण निधीने (आयसीपीएफ) म्हटले आहे.

देशात टाळेबंदी लागू झाल्यापासून ‘चाइल्ड पॉर्न’, ‘सेक्सी चाइल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ यांसारखे शब्द इंटरनेटवर टाकून त्यातून वेबसाइट पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असा ‘ऑनलाइन डाटा मॉनिटरिंग’चा अहवाल आहे. ‘पोर्नहब’ या जगातील सर्वात मोठ्या पोर्नोग्राफी वेबसाइटवरील आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की,लॉकडाऊनपूर्वी चाइल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे सरासरी प्रमाण आता तुलनेने २४ ते २६ मार्च दरम्यान ९५ टक्क्यांनी वाढले आहे. हे निरीक्षण ‘आयसीपीएफ’ने मांडले आहे.

लहान मुलांवर अत्याचार करणारे आणि लहान मुलांशी संबंधित अश्लील चित्रपट पाहण्याची सवय असणारे लाखो लोक सध्या ऑनलाइन पद्धतीने आपली विकृती भागवत आहेत. त्यामुळे मुलांसाठी इंटरनेट हे माध्यम अत्यंत असुरक्षित बनले आहे. यावर कठोर कारवाई न झाल्यास मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये तीव्र वाढ होऊ शकते, असे आयसीपीएफने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि आपल्या राष्ट्रीय धोरणाचे हे उल्लंघन आहे. पोर्नोग्राफिक वेबसाइट्स त्यांच्या वेबसाइटची यूआरएल बदलून भारतीय कायदा आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवत आहेत. भारत सरकारने तातडीने बाल अश्लिलतेवर कारवाई करावी, तसेच बाल-लैंगिक अत्याचार सामग्रीविरूद्ध आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी सर्व देशांशी चर्चा करावी, असे ‘आयसीपीएफ’च्या प्रवक्त्या निवेदिता आहुजा यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, भुवनेश्वर आणि इंदूर यांसारख्या १०० शहरांत ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’साठी किती मागणी आहे, या बाबतचे संशोधन ‘आयसीपीएफ’ने केले आहे. भारतातील बाल लैंगिक अत्याचार सामग्री ’या नावाचा हा अहवाल या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. डिसेंबर २०१९  मध्ये १०० शहरांत सार्वजनिक ‘वेब’वर ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’साठी सरासरी ५० लाख इतकी दरमहा मागणी होती. ती आता वाढली आहे. या अहवालानुसार, मुले गुदमरणे, त्यांना रक्तस्राव होणे आणि त्यांचा छळ होणे, या स्वरुपाच्या हिंसक सामग्रीच्या मागणीत २०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

भारतीय पुरुष सर्वसाधारण चाइल्ड पोर्नोग्राफीत समाधान मानत नाहीत. त्यांना हिंसक आणि शोषक स्वरुपाच्या फिल्म पाहायच्या असतात, हेच यावरून स्पष्ट होते.  डिसेंबरमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई ही मेट्रो शहरे, तसेच मध्यम स्वरुपाची व राज्यांच्या राजधानी असलेली शहरे ही चाइल्ड पोर्नोग्राफीसाठीची ‘हॉटस्पॉट’ म्हणून गणली गेली आहेत. याच शहरांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होण्याची प्रकरणे सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या शहरांत बालशोषणाची प्रकरणे होऊ नये, म्हणून ऑनलाईन दक्षता वाढवण्यासाठी संस्थेने सरकारी अधिकाऱ्यांना विनवणी केली आहे.

 चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाइन’च्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तातडीची मदत व संरक्षण मागणारे ९२,००० हून अधिक कॉल्स वॉकडाऊननंतरच्या ११ दिवसांत या हेल्पलाइनला आलेले आहेत. यावरून लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे भीषण सत्य समोर येते. चाइल्ड पोर्नोग्राफीसारख्या लैंगिक अत्याचार सामग्रीला मागणी मोठ्या प्रमाणात वाढले. यातून मुले लैंगिक अत्याचारास बळी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे, असे आयसीपीएफने अहवालात नमूद केले आहे.

चाइल्ड पोर्नोग्राफीची हॉटस्पॉट्स

  • साधारण स्वरुपाच्या चाइल्ड पोर्नोग्राफीच्या सामग्रीची मागणी भुवनेश्वर आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक आहे.
  • विशिष्ट व्यक्ती, वयोगट, स्थाने इत्यादींशी संबंधित सामग्रीची मागणी कोलकाता, सिलीगुडी, हावडा, चंदीगड, गुवाहाटी, इंदूर, भुवनेश्वर आणि चेन्नई या शहरांत सर्वात जास्त आहे.
  • उत्तरेकडील नवी दिल्ली, लुधियाना, रायपुरा, लखनऊ, चंदीगड, आग्रा आणि सिमला येथे, मध्य भारतात रायपूर, रांची आणि इंदूरमध्ये, पश्चिमेतील मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदाबाद; पूर्वेस इम्फाळ, गुवाहाटी, कोलकाता, हावडा आणि शिलॉंग; तसेच दक्षिण भारतात बंगळूर, कोची आणि तिरुअनंतपुरम येथे चाइल्ड पोर्नोग्राफीला सर्वाधिक मागणी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा