कोरोनाचा संसर्ग: व्यक्ती किंवा समूहावर जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक

0
32
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समूहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्देशांनुसार सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समूहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरली जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा