पंतप्रधान मोदींमुळेच भारतात कोरोनाचा प्रादुर्भावः प्रकाश आंबेडकरांचा थेट आरोप

0
16
संग्रहित छायाचित्र.

अकोलाः भारतात कोरोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. देशात योग्यवेळी परदेशी प्रवाशांना बंदी घातली असती किंवा त्यांची चाचणी करून प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना पसरलाच नसता, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

देशातील जनतेला जगण्याची हिम्मत देण्याऐवजी सरकार त्यांना भयभीत करत आहे. आपल्या फायद्यासाठी सरकारचे हे षडयंत्र आहे.कोरोना बाधितांची संख्या कमी असताना कडक टाळेबंदी आणि आता रूग्णांची संख्या लाखोंच्या घरात जात असताना टाळेबंदी शिथिल करण्यात येत आहे. हा सगळाच प्रकार अनाकलनीय आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

टाळेबंदीमध्ये १५ कोटी लोकांचे हाल झाले. कोरोनाची भीती सरकारनेच आणली. तुम्ही मरणारच आहात हे जनतेच्या मनावर सरकारकडूनच बिंबवले गेले आहे, असा आरोप करतानाच ३० जूनपर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा पाच लाखांपर्यंत जाईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा