प्राप्तिकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवाः मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

0
23
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे प्राप्तिकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रीम कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती त्यांनी आज केली.

फेब्रुवारी २०२० ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती देखील वाढवून द्यावी. या अनुषंगाने मुदतीनंतर करभरणा केल्यास लागणारा दंड, शुल्क आणि व्याज माफ करावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा