कोरोनामुळे मृत पोलिसांचे कुटुंबीय निवृत्तीच्या तारखेपर्यंत शासकीय निवासस्थानातच राहणार!

0
19

मुंबईः कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून संबंधित पोलिसांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहण्याची मुभा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे.

दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत आता त्यांच्या कुटुंबियांना शासकीय  निवासस्थानी राहता येणार आहे. राज्य सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या बदल्यात आपण कमीतकमी इतके तर करू शकतो असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाच्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना ४२८८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३२३९ जण पूर्णतः बरे झाले आहे ही आनंददायक बाब असली तरी ५४ जणांचा बळी गेला आहे ही दु:खद आणि दुर्दैवी बाब असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा