मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत काटेकोर नियमावली तयार करूनच अंतिम निर्णयः राजेश टोपे

0
495
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनमुळे राज्याचे रूतलेले अर्थचक्र रूळावर आणण्यासाठी राज्य सरकारने २० एप्रिलपासून काही बाबींना लॉकडाऊनच्या नियमातून सूट दिली आहे. उद्योग- व्यवहार हळूहळू सुरू करून अर्थव्यस्थेला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या एकूण महसुलात मोठा वाटा असलेल्या उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत येणारी मद्य विक्रीची दुकाने गेल्या सहा आठवड्यांपासून बंद आहेत.

हेही वाचाः मदतीतही फ्रॉड?: राज्यातील दिग्गज भाजप नेत्यांनी शेअर केली पीएम केअर्स फंडाची बनावट लिंक!

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सोमवारी फेसबुक लाइव्ह दरम्यान मद्यविक्रीची दुकाने केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन झाले तर मद्य विक्रीच्या दुकानांवर बंदी घालू नये, असे सांगितले होते.

हेही वाचाः महाराष्ट्रातील ८१ टक्के कोरोना बाधित रुग्णांत संसर्गाची कोणतीही लक्षणेच दिसेनात!
पुण्याची लोकसंख्या, झोपडपट्टी हे कोरोनाचे प्रमाण जास्त असण्याचे कारणः विभागीय आयुक्त म्हैसेकर

टोपे यांनी मद्यविक्रीची दुकाने उघडण्याबाबत ट्विट करून खुलासा केला आहे. लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल, असे ट्विट टोपे यांनी केले आहे. टोपे यांच्या या ट्विटमुळे गेली सहा आठवडे घश्याला कोरड पडल्याने हैरान झालेल्या तळीरामांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा