विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा रद्दच, ज्यांना द्यायची त्यांना मात्र मुभा

0
55

मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पण ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे. त्या परिक्षा घेण्याबाबत कोविड-१९ च्या प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल,असे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जाहीर केले.

अंतिम वर्षाच्या,अंतिम सत्राच्या परिक्षा द्यायच्या आहेत किंवा परीक्षा द्यायच्या नाहीत याबाबत त्यांनी लेखी स्वरूपात विद्यापीठाकडे आपले मत कळवावे परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे परीक्षा द्यायची नाही त्यांना पदवी प्राप्त होईल आणि  परीक्षा द्यायची आहे, त्याबाबत कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नंतर निर्णय घेण्यात येईल, असे उच्च तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी सांगितले.          

काल  राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची  बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत कोविड -१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंतिम वर्षाच्या /अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. अनेक दिवसपासून विद्यार्थी आणि पालकांच्या मनात विद्यापीठाच्या परीक्षेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला  आहे.

व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थी जे सर्व सत्रांत उत्तीर्ण झालेले आहेत आशा अंतिम सत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नसेल तर अशा विद्यार्थ्यांकडून लेखी लिहून घेवून विद्यापीठाने त्यांना अतिम परीक्षा पास करून पदवी प्रमाणपत्र दयाचे आहे. तसेच ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यानी देखील लेखी दिल्यानंतर याबाबत  कोविड-१९ च्या प्रादुर्भावाचा स्थानिक पातळीवर अंदाज घेऊन नियोजन करावयाचे आहे

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अशाच प्रकारे परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी अफेक्ट बॉडीची परवानगी घेण्यात येणार आहे. तसेच येत्या चार दिवसात बॅगलॉक आणि ऐटीकेटी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करून  शासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आज जारी  करण्यात आला आहे असेही सामंत यांनी संगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा