विद्यापीठांच्या अंतिम वर्ष- अंतिम सत्र परीक्षा रद्द, सर्व सेमिस्टरची सरासरी लक्षात घेऊन मार्क्स देणार

0
509
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की  नाही याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून असलेली अनिश्चितता आज अखेर संपुष्टात आली आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरला मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी गुण देऊन पास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा आता होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. ज्यांना हे मान्य आहे, त्यांच्याच साठी हा निर्णय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पाचवा लॉकडाऊन लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक/ ट्विटर लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधल. त्यावेळी त्यांनी ही महत्वाची घोषणा केली. आता पावसाळा सुरु होतोय. त्याची काळजी घेतांना यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा शिक्षणाचाही काळ आहे. त्याकडे लक्ष देतांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय काळजीपूर्वक आणि चर्चेअंती घेतला गेला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देऊन पास करावयाचा आणि त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. ज्यांना वाटते की परीक्षा दिल्यानंतर मी यापेक्षा अधिक चांगले मार्क्स मिळवू शकलो असतो त्यांच्यासाठी पुढे काही कालावधीने परीक्षा घेतल्या जातील हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शाळेपेक्षा शिक्षण सुरु करण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण-शहरी भाग, ग्रीन झोन सह राज्यात सुरु करावयाच्या शिक्षणासाठीच्या उपाययोजनाचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्यक्ष जिथे शाळा सुरु करता येतील तिथे शारीरिक अंतराच्या व इतर उपाययोजनांसह शाळा सुरु करणे, जिथे हे शक्य नाही तिथे ऑनलाईन शाळा सुरु करणे, टॅब, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण देणे याबाबत येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री ठाकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा