औरंगाबादेत आणखी ४ कोरोना पॉझिटिव्ह, एकूण बाधितांची संख्या २४ वर

1
1248

औरंगाबादः औरंगाबादेत आज आणखी ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २४ वर गेली आहे. नव्याने आढळून आलेले चार जण कोरोना पॉझिटव्ह रूग्णांचे निकट सहवासित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांत किरडापुऱ्यातील दोन, आरेफ कॉलनीतील एक आणि देवळाई परिसरातील एक रूग्ण आहेत. हे सर्व जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे निकट सहवासित आहेत. आता हे पॉझिटिव्ह रूग्ण कोणाच्या संपर्कात आले आहेत, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आज आढळून आलेल्या चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ वर गेली आहे. यापूर्वी औरंगाबादेत एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांत किराडपुऱ्यातील एक ११ वर्षीय मुलगी आणि तिच्या ३३ वर्षीय आईचाही समावेश आहे. उर्वरित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आरेफ कॉलनीतील एक ७० वर्षीय पुरूष आणि देवळाईतील एका ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा