औरंगाबादजवळ रेल्वे रूळावर झोपलेल्या मजुरांना मालगाडीने चिरडले, १६ झोपेतच ठार

1
935

औरंगाबादः लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन सरकारने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी रेल्वे सुरू केल्यामुळे आपल्यालाही गावी जायला मिळेल, या आशेने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी रेल्वे रुळानेच पायपीट करत जालन्याहून औरंगाबादकडे निघालेल्या स्थलांतरित मजुरांना मालगाडीने चिरडले. त्यात १६ मजूर जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बदनापूर- करमाड दरम्यान सटाणा शिवारात आज पहाटे ही भीषण घटना घडली.

जालन्याच्या एसआरजे कंपनीत कामाला असलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते जालन्याहून पायीच रेल्वे रूळाच्या मार्गानेच औरंगाबादच्या दिशेने निघाले होते. रात्र झाल्यामुळे करमाड- बदनापूरदरम्यान सटाणा शिवाराज रेल्वे रूळावरच अंथरूण टाकून ते झोपी गेले होते. पहाटेच्या सुमारास जालन्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीने त्यांना चिरडले यात १६ मजूर जागीच ठार झाले. घटनास्थळी या मजुरांच्या शरीराच्या तुकड्यांचा अक्षरशः सडा पडलेला होता. या मजुरांना चिरडणारी मालगाडी नांदेडहून मनमाडला पेट्रोल-डिझेलसाठी निघाली होती, असे औरंगाबाद रेल्वे स्थानकातून सांगण्यात आले.

मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदतः मुख्यमंत्री- दरम्यान, या मजुरांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख   रुपये मदत जाहीर केली आहे. जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा