महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता

0
14

मुंबई : कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातील सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचा पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचवण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा