अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय लांबणीवर, आता १० ऑगस्टला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0
97
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्ष/ अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयात या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आता १० ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ( यूजीसी) मार्गदर्शक तत्वांना आव्हान देत परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आज निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली असून आता १० ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा घेण्याची सूचना विद्यापीठांना करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचनांना युवा सेनेसह अनेक विद्यार्थ्यांनी आव्हान दिले आहे. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार यूजीसीने प्रतिज्ञापत्राद्वारे आपली भूमिका मांडली आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, या भूमिकेवर यूजीसी ठाम आहे. तीच भूमिका यूजीसीने सर्वोच्च न्यायालयातही मांडली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा