१५ जुलैपर्यंत बारावीचा, जुलैअखेरीस दहावी परीक्षेचा निकालः बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती

0
102
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल लावण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून १५  जुलैपर्यंत बारावीचा तर जुलै अखेरपर्यंत दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाइन वर्गांचा आढावा घेतला. त्यावेळी काळे यांनी ही माहिती दिली. यंदा मार्च २० च्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते. मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, असे सांगितले. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे, अशी माहिती  त्यांनी दिली.

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी १ जुलैपासून महाविद्यालयांची नोंदणीः दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाइन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाइल ऍप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

 ग्रामीण भागातील प्रक्रिया ऑफलाइनचः मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाइन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील, असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा