मुंबईची लाईफलाइनही आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत बंद

0
73
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज भारतीय रेल्वेने आज मोठा निर्णय घेतला. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या इतिहासात तब्बल ९ दिवस लोकल बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. मुंबईत आज ६ कोरोनाग्रस्त नव्याने आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारीची आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत मुंबईतील लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई लोकल आणि कोलकाता मेट्रोतील लोकल आज काही वेळा पुरत्या धावतील. याबरोबच देशभरातील सर्व प्रवाशी रेल्वेही ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. आता ३१ मार्चपर्यंत देशातील लोहमार्गावर फक्त मालगाड्या धावतील.

हेही वाचाः मालगाड्या वगळता देशभरातील सर्व रेल्वे ३१ मार्चपर्यंत बंद!

१३ मार्चपर्यंत रेल्वेने प्रवास केलेल्या १२ प्रवाश्यांमार्फत देशातील १६ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो आधीपासूनच बंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री काही वेळासाठी दिल्ली मेट्रोच्या रेल्वे धावतील. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत देशभरातील प्रवाशी रेल्वे बंद करण्यात आल्या  होत्या.

हेही वाचाः मुंबईत कोरोनाचा दुसरा बळी, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ वर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा