नगरपालिका, महापालिका क्षेत्राबाहेर उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा, अधिसूचना जारी

0
110
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने शुक्रवारी नवीन अधिसूचना जारी केली असून त्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे उद्योग २० एप्रिलनंतर सुरू करता येऊ शकतील.

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा घोषित झाल्यानंतर राज्य सरकारने या टप्प्यासाठी सुधारित अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील भागातील ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यात येतील.ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी उद्योगांना चालना देता येईल. या उद्योगांसाठी काही नियम असतील. यात उद्योगांना आपल्या कामागारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करावी लागेल. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून कामगारांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून कामगारांची ने आण करण्यास मनाई असेल.

परवानगी देण्यात आलेल्या उद्योगात जीवनावश्यक वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल व आधारित उत्पादन करणारे उद्योग, सर्व प्रकारचे कृषी, फलोत्पादन व कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतूक उद्योग, उत्पादन एकक, ज्यात प्रक्रिया सातत्याची आवश्यकता आहे आणि पुरवठा साखळीतील उद्योग, आय टी हार्डवेअर उत्पादन, कोळसा उद्योग, खाण आणि खणीज उद्योग, (सुक्ष्म खणीजांसह),  त्याची वाहतूक. खाणींसाठी आवश्यक असलेल्या विस्फोटकांचा पुरवठा-पॅकेजिंग उद्योग, ग्रामीण भागातील विट भट्ट्या,गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्य तेलाशी संबधित सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा