औरंगाबादेत १० ते १८ जुलैदरम्यान जनता कर्फ्यू!

0
983

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १० जुलै ते १८ जुलै असे आठ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या काळात उद्योगधंदेही बंद रहातील.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शहरी भागात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. लॉकडाऊनच्या काळातही एवढ्या झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढली नव्हती. गेल्या आठवडाभरापासून दररोज दोनशेच्या आसपास कोरोना बाधित रूग्ण आढळत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यासाठी आज विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कार्यालयात शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत शुक्रवार,१० जुलै ते शनिवार १८ जुलै या काळात शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू, औषधे खरेदी करून ठेवाव्यात. घाबरून जाऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.

औरंगाबादेतील कोरोनाचा वाढता आलेखः लॉकडाऊन शिथील होण्यापूर्वी म्हणजेच एक जून रोजी शहरात २६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते तर या दिवसापर्यंत शहरातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या १ हजार ५६९ होती आणि ७२ जणांचा मृत्यू झाला होता. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरच्या काळात आज ७ जुलै रोजी सकाळी १५० कोरोना बाधित रूग्ण आढळले. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ हजार ८८० वर पोहोचली आणि मृतांचा आकडाही ३१० वर पोहोचला आहे. सध्या ३ हजार १९६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात आज आढळले १०१ रूग्णः आज सकाळी आढळलेल्या रूग्णांत मनपा हद्दीतील १०१ रूग्ण आहेत. त्यात पद्मपुरा १५, दशमेश नगर ७, शिवशंकर कॉलनी ८, नाईक नगर ४, उस्मानपुरा ५,  गजानन कॉलनी ३,  घाटी परिसर १, जाधव मंडी ३, अरिष कॉलनी ३, सिडको एन-११ ३, दिल्ली गेट १, गजानन नगर ४, पुंडलिक नगर १, छावणी २, किराणा चावडी १, एन ११ हडको, १, आदर्श कॉलनी गारखेडा १, उल्कानगरी २, एमआयडीसी, चिखलठाणा १, मातोश्री नगर २, नवजीवन कॉलनी १, श्रध्दा कॉलनी १,  एन-६ १, एन-२ सिडको, ठाकरे नगर १, जटवाडा रोड १, पोलिस कॉलनी २, वेदांत नगर १, टिळक नगर १, एन-९ सिडको १, प्रगती कॉलनी १, देवळाई, सातारा परिसर २,जयभवानी नगर ३, अंबिका नगर १, सिंधी कॉलनी १,पडेगाव २, सिल्क मिल कॉलनी ४, रेल्वे स्टेशन परिसर ४, टिव्ही सेंटर ४, अन्य १. 

ग्रामीण भागातील रुग्ण ४९ आढळलेः आज सकाळी ग्रामीण भागात ४९ रूग्ण आढळले. त्यात विहामांडवा १, सिध्देश्वर नगर, सुरेवाडी १, कारंजा १, वाळुज १, हिरापुर सुंदरवाडी ३, स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर २, सावरकर कॉलनी, बजाज नगर २,  वडगांव बजाज नगर २, निलकमल सोसायटी, बजाज नगर ४, साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर ५, साऊथ सिटी, बजाज नगर १, दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी १, सायली सोसायटी बजाज नगर ३, शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी २,  जिजामाता सोसायटी बजाज नगर ३,  पंचगंगा सोसायटी बजाजनगर १, विश्व विजय सोसायटी बजाजनगर २, डेमनी वाहेगांव ३, पैठण ३, इंदिरा नगर, वैजापुर ५, अजिंठा २, शिवणा १, याभागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा