महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन, पण जाणून घ्या मुभा आणि निर्बंध असलेल्या बाबी

0
124
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयाची अधिसूचना शासनाने आज जारी केली. या कालावधीत काय सुरू राहील आणि कोणते निर्बंध रहातील, त्याविषयी…

मास्कचा वापर: सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान चेहरा झाकून घेणारी साधणे/ मास्क वापरणे बंधनकारक आहे.

सामाजिक अंतर पाळणे(सोशल डिस्टंसिंग): प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान ६ फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे. ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी,दुकानांमध्ये एका वेळी ५ व्यक्तींपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.

जमावाबाबतची बंधने: मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील.विवाह सोहळ्याला ५० पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना ५० पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.

-सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.मद्य, पान, तंबाखू इ. चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या सूचना :

घरातून काम (वर्क फ्रॉम होम):  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
कार्यालये, कामाची जागा, दुकाने,  बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.

तपासणी व स्वच्छताः कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी.

संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्ट मध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

सुरक्षित अंतर:  कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी/कामगारांत प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेउन काम करतील याची दक्षता घेतली जाणे आवश्यक राहील. कर्मचाऱ्यांनी दुपारचे जेवण एकत्र घेऊ नये व  त्यांनी सुरक्षित अंतर पाळावे याबाबींची कार्यालय प्रमुखाने काळजी घेणे आवश्यक राहील.

सरकारी कार्यालयात १५ टक्क्चे कर्मचारीः सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांच्याशिवाय) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.

लांबच्या प्रवासावर निर्बंधः मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतूक करू शकतो. लोकांनी खरेदीसाठी फक्त जवळपास/ शेजारच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित आहे. अनावश्यक वस्तूंसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी दिली जाणार नाही.

११ महापालिकांत निर्बंधाच्या अधीन संमतीः मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, आधी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे.या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.

आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवानगीः आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील. जिल्ह्या अंतर्गत प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील.

-अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना ३१ मे आणि ४ जून रोजीच्या आदेशांमधील शिथीलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे.
-मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने, दुकानांचा परिसर ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली राहतील. -मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलिव्हरी सुरु राहील.
-अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स कृती सुरु राहतील.
-सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील.
-संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी मान्सूनपूर्व कामे सुरु राहतील.
-होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील.
-ऑनलाईन शिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील.
-सर्व खाजगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
-टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ प्रवासी क्षमतेनुसार चालवण्याची परवानगी राहील.
-स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ.
-पूर्वपरवानगी घेऊन वाहनांची दुरुस्ती करणारी गॅरेज.
-२३ जूनच्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील.
-काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी.
-वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा सुरू राहील.
-शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालय/ शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामांसाठी ज्यामध्ये ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामे करता येतील.
-राज्य शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर
-कोणत्याही विशिष्ट / सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेली अन्य कोणतीही कामे.

उर्वरित राज्यभरात पुढील बाबींना अटी-शर्तींवर परवानगीः

शासकीय आणि खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी- दुचाकी- फक्त चालक.
तीन चाकी वाहन- चालक आणि २ प्रवासी
-चार चाकी वाहन- चालक आणि २ प्रवासी.
-अत्यावश्यक नसलेली दुकाने, सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.
-खुल्या जागा,लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळयासाठी निमंत्रितांना बोलवण्यासाठी देण्यात आलेली परवानगी २३ जून २०२० च्या निर्णयानुसार असेल.
-निर्बंधासह खुल्या जागेतील व्यायाम व इतर शारीरिक हालचाली.
-विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा यांची कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे अशैक्षणिक कामांसाठी असणारे कर्मचारी यांना ई कंटेट तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे, परीक्षेचे निकाल घोषित करणे,यासाठी उपस्थित राहण्यास परवानगी.
-केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना काही अटींवर परवानगी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा