विद्यार्थी- कामगारांना घर खाली करायला सांगणाऱ्या घरमालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई

0
97
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काम बंद असल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जे कामगार, स्थलांतरित नागरिक आणि विद्यार्थी भाड्याने घर घेऊन राहत आहेत, त्यांच्या घरमालकांनी त्यांच्याकडून एक महिन्याचे घरभाडे घेऊ नये, असे निर्देश सरकारने जारी केले असून कोणत्याही घरमालकाने विद्यार्थी, कामगार आणि स्थलांतरित नागरिकांस भाड्यासाठी घर खाली करायला सांगितल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केलेल्या परिपत्रकात दिल्या आहेत.

 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केलेल्या उपाययोजनांमुळे अडकून पडलेल्या गरीब, गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था आणि लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघालेल्या राज्यातील आणि परराज्यातील कामगारांची आहे तेथे तात्पुरत्या निवारा केंद्रात जेवण-राहण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असले तरी दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि उद्योगांना त्यांच्या कामगारांचे पगार कोणतीही वजावट न करता देण्याच्या सूचना संबंधित आस्थापना आणि मालकांना देण्यासही जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने हे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा