औरंगाबादेतील लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवसः सकाळी ८४ नवे कोरोना रूग्ण, दोघांचा मृत्यू

0
69
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद:  कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी १० जुलैपासून लागू केलेल्या संपूर्ण लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस असून आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन संपुष्टात येणार आहे. दरम्यान, आज सकाळी जिल्ह्यात ८४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार १६६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी ५ हजार ८६१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात ३ हजार ९१८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेतील झपाट्याने वाढत चाललेली कोरोना बाधितांची रूग्णसंख्या लक्षात घेता १० जुलैपासून शहरात कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज मध्यरात्रीपासून तो संपुष्टात येणार असून उद्या सकाळपासून सर्व व्यवहार सुरळित होणार आहेत. असे असले तरी सर्व किराणा दुकान चालक, भाजीपाला विक्रेते, दूध,फळ विक्रेते, चिकन-मटन, मासे,अंडी विक्रेत्यांना कोरोनासाठी अँटिजेन चाचणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. चाचणीशिवाय व्यवहार सुरू करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

हेही वाचाः औरंगाबादेतील लॉकडाऊन शनिवारी मध्यरात्री संपणार; व्यापारी, विक्रेत्यांना अँटिजेन टेस्टची सक्ती

आणखी वाचाः औरंगाबाद लॉकडाऊनः किराणा दुकानदार, अन्य विक्रेत्यांना या ठिकाणी करता येईल अँटिजेन टेस्ट

आज सकाळी औरंगाबाद महापालिका हद्दीत १२ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात  सादात नगर १, पुंडलिक नगर १, चिकलठाणा १, संजय नगर १, हिमायत बाग १, पद्मपुरा १, क्रांती नगर १, मिल कॉर्नर १, अमृतसाई प्लाजा १, छावणी परिसर १, छत्रपती नगर, सातारा परिसर १, अन्य १ रूग्ण आहेत. 

ग्रामीण भागात ६७ रूग्ण आढळले. त्यात वैजापूर ८, राधेय सोसायटी, बजाज नगर ७, वाळूज, बजाज नगर ५, सिडको महानगर ४, जय भवानी चौक, बजाज नगर ४, स्नेहांकित सोसायटी, बजाज नगर ३, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर २, चिंचबन कॉलनी, बजाज नगर २, छावा सोसायटी, बजाज नगर ३, रांजणगाव, गंगापूर ३, बजाज विहार २, भानुदास नगर, गंगापूर २, कन्नड १, इंदिरा नगर, गोंदेगाव १, महालक्ष्मी सोसायटी, बजाज नगर १,  स्वस्तिक नगर १, वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर १, बजाज नगर १, न्यू संजिवनी सोसायटी, बजाज नगर १, गजानन सोसायटी, बजाज नगर १, जिजामाता सोसायटी, बजाज नगर १, ओमशक्ती सोसायटी, बजाज नगर १, बकवाल नगर, नायगाव १, अविनाश कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज १, अजिंक्यतारा सोसायटी, शिवाजी नगर, वाळूज १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, सरस्वती सोसायटी, १, जागृत हनुमान मंदिर परिसर १, शिवकृपा सोसायटी, बजाज नगर १, ओमसाई नगर,रांजणगाव १, मोहटा मंदिराजवळ, बजाज नगर १, शिवनेरी सोसायटी, बजाज नगर १, मयूर पार्क १, सोसायटी, बजाज नगर १ असे रूग्ण आहेत.

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यूः शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील ६२ वर्षीय, जाधवमंडी राजा बाजारातील ६० वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा