मद्यप्रेमींसाठी खुशखबरः ई- टोकन घ्या आणि दारू खरेदी करा !

2
715
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः लॉकडाऊन-३ मध्ये काही नियमांत शिथिलता आणून राज्य सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर दारू विक्रीच्या दुकानांसमोर उडालेली झुंबड पाहता आता गर्दी टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदीसाठी ई- टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. हे ई- टोकन घेऊन राज्यातील मद्यप्रेमींना दारू खरेदी करता येणार आहे.

राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून राज्यातील वॉइन शॉप्स उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र वॉइन शॉप्स उघडल्यानंतर मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दारू विक्रीच्या दुकानांसमोर प्रचंड झुंबड उडाल्यामुळे अनेक ठिकाणी ही वाइन शॉप्स बंद करण्यात आली आहेत. वॉइन शॉप्ससमोर होणारी गर्दी टाळून मद्यविक्री करण्यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई-टोकन प्रणाली आणली आहे. मद्यप्रेमींना हे ई- टोकन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या http://www.mahaexcise.com या संकेतस्थळावरून घेता येईल.

असे मिळवा ई- टोकनः ज्या ग्राहकांना दारू खरेदी करायची आहे, त्यांना या संकेतस्थळावर आपला मोबाइल क्रमांक, नाव, जिल्हा आणि पिनकोड क्रमांक नमूद करून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या वॉइन शॉप्सची यादी दिसेल. या यादीतील एका दुकानाची निवड करून विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड करावी लागेल. त्यानुसार ग्राहकास ई-टोकन देण्यात येईल. या ई-टोकनच्या आधारे ग्राहकाला ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळी वॉइन शॉप्समध्ये जाऊन दारू खरेदी करता येईल. या प्रणालीनुसार टोकन देताना एका विशिष्ट वेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक दुकानात असणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ही सुविधा पुणे शहरात उपलब्ध करून देण्यात येईल. येथील अनुभव पाहून राज्यात उर्वरित ठिकाणीही  ई-टोकन प्रणाली सुरू करण्यात येईल.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा