लॉकाऊन आवश्यक, पण नियोजनात अभाव आणि अंमलबजावणीत चुकाः सोनिया गांधी

0
68
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र त्याची अंमलबवाजणी करताना नियोजनाच्या अभावामुळे देशभरातील लाखो स्थलांतरित कामगारांना प्रचंड यातना आणि गैरसोयीला सामोरे जावे लागले, अशा शब्दांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर टिकास्त्र सोडले.

काँग्रेस कार्यकारी समितीला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, अन्नपाण्याशिवाय लाखो लोक हजारो किलोमीटर पायपीट करत त्यांच्या गावाकडे जात असल्याचे चित्र ह्रदयद्रावक आहे. त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून त्यांना शक्य तेवढी मदत करणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आज पिके काढणीसाठी तयार आहेत. सर्व काही प्रतीक्षा करू शकते मात्र शेती प्रतीक्षा करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची काढणी आणि शेतीमालाला योग्य भाव देणे ही काळाची गरज आणि सरकारची जबाबदारीही आहे. संबंध देश लॉकडाऊन असताना शेतकऱ्यांना तत्काळ खते, किटकनाशके आणि पतपुरवठा करून देण्याची गरज आहे. खरिपाची पिकाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आताच मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

मध्यमवर्गीय या संकटात भरडला जात आहे. पगार कपात, सर्व क्षेत्रातील नोकर कपात, गॅस,पेट्रोल-डिझेलच्या च्या किमतींमुळे त्यांच्यावर प्रचंड ताण पडत आहे. हे कमी म्हणून की काय ईएमआय तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे, मात्र व्याज माफी अन्य दिलासा त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ईएमआय स्थगितीचा मूळ हेतूच नाहीसा झाला आहे. सरकारने सर्वंकष दिलासा योजना जाहीर करावी, अशी विनंतीही सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा