महाराष्ट्रात आज कोरोनाचे १,५७६ नवीन रुग्ण; एकूण रूग्णसंख्या २९ हजार १०० रुग्ण

0
74

मुंबई :  राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली असून आज १ हजार ५७६ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे.  दुसरीकडे आज राज्यात ४९ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ६८ झाली आहे.

आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज मुंबईत ३४,पुण्यात ६,अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये २, धुळयात २, पनवेलमध्ये १,जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

 आतापर्यंत ६,५६४ रुग्ण कोरोनामुक्तः  राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

अडीच लाख चाचण्याः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी):

मुंबई महानगरपालिका: १७,६७१ (६५५)
ठाणे: १८९ (३)ठाणे मनपा: १३०२ (११)
नवी मुंबई मनपा: ११७७ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४४४ (६)
उल्हासनगर मनपा: ८६
भिवंडी निजामपूर मनपा: ४१ (२)
मीरा भाईंदर मनपा: २६० (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: ३२१ (११)
रायगड: २१२ (२)
पनवेल मनपा: १८० (१०)
ठाणे मंडळ एकूण: २१,९२५ (७१८)

नाशिक: ९९
नाशिक मनपा: ६३
मालेगाव मनपा:  ६६३ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ६४ (५)
जळगाव: १९० (२३)
जळगाव मनपा: ५६ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२३८ (७४)

पुणे: १८५ (५)
पुणे मनपा: ३१४१ (१७२)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३५६ (२०)
सातारा: १२६ (२)
पुणे मंडळ एकूण: ३९७२ (२०४)

कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३७
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८६ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १६२ (५)

औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६८३ (२०)
जालना: २१
हिंगोली: ६६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ८७१ (२१)

लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ६
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९६ (५)

अकोला: १९ (१)
अकोला मनपा: २०७ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: ९२ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४५२ (२८)
नागपूर: २
नागपूर मनपा: ३३२ (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३४३ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण रूग्णसंख्या:  २९ हजार १००  एकूण मृत्यूः १०६८

(टीपः ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा