कोरोनाची मगरमिठीः राज्यात आज १,२१६ नवे रूग्ण, ४३ मृत्यू; एकूण रूग्णसंख्या १७ हजार ९७४

0
79

मुंबई:  राज्यातील कोरोनाचा कहर सुरूच असून आज १, २१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ९७४ झाली आहे. दरम्यान, आज राज्यात ४३ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ६९४ झाली आहे. आज २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात   ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत २४, पुण्यात ७ मृत्यूः आज राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ६९४ झली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २४, पुण्यातील ७, वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला. याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला. मृतांमध्ये २४ पुरूष आणि १९ महिलांचा समावेश आहे.

२ लाख १२ हजारांहून अधिक लोक होम क्वारंटाइनः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी):
-मुंबई महानगरपालिका: ११,३९४ (४३७)
-ठाणे: ९३ (२)
ठाणे मनपा: ६५० (८)
नवी मुंबई मनपा: ६५९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २६३ (३)
उल्हासनगर मनपा: १४
-भिवंडी-निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा-भाईंदर मनपा: १८९ (२)
पालघर: ४६ (१)
-वसई-विरार मनपा: १८७ (९)
रायगड: ७६ (१)
पनवेल मनपा: १२५ (२)
ठाणे मंडळ एकूण रूग्णः १३,७१७  मृत्यूः ४७२

नाशिक: ४७
नाशिक मनपा: ५४
मालेगाव मनपा:  ४३२ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ६४ (११)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण रूग्णः ७१५  मृत्यूः ३१

पुणे: १०५ (४)
पुणे मनपा: १८९९ (१२२)
पिंपरी-चिंचवड मनपा: १२५ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १७७ (१०)
सातारा: ९४ (२)
पुणे मंडळ एकूण रूग्णः २४०६  मृत्यूः १४१

कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ४ (१)
रत्नागिरी: १६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण रूग्णः  ७१  मृत्यूः ३

औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३९७ (१२)
जालना: ८
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण रूग्णः ४६८  मृत्यूः १३

लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २९ (२)
लातूर मंडळ एकूण रूग्णः  ६१  मृत्यूः ३

-अकोला: ९ (१)
अकोला मनपा: ९० (९)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ६९ (९)
यवतमाळ: ९३
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण रूग्णः २९०  मृत्यूः २१

नागपूर: २
नागपूर मनपा: २०४ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण रूग्णः २१२  मृत्यूः २

इतर राज्ये एकूण रूग्णः  ३४  मृत्यूः ८

 (ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा