राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४२०० वरः ५५२ नवीन रूग्ण, १२ रूग्णांचा मृत्यू

0
43

मुंबई: राज्यात आज ५५२ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४२०० झाली आहे. आज १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर १ मृत्यू सोलापूर मनपा आणि १ मृत्यू जामखेड अहमदनगर येथील आहे. त्यात ४ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्यूमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २७२४ (१३२)
ठाणे: २० (२)
ठाणे मनपा: ११० (२)
नवी मुंबई मनपा: ७२ (३)
कल्याण डोंबवली मनपा: ६९ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ५
मीरा भाईंदर मनपा: ७१ (२)
पालघर: १७ (१)
वसई विरार मनपा: ८५ (३)
रायगड: १३
पनवेल मनपा: २७ (१)
ठाणे मंडळ एकूण: ३२१४ (१४८)

नाशिक: ४
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा:  ७८ (६)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: १
नाशिक मंडळ एकूण: १२१ (१०)

पुणे: १७ (१)
पुणे मनपा: ५४६ (४९)
पिंपरी चिंचवड मनपा: ४८ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १५ (२)
सातारा: ११ (२)
पुणे मंडळ एकूण: ६३७ (५५)

कोल्हापूर: ३
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४० (१)

औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ३० (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)

लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२

अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १४
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ४८ (३)

नागपूर: २
नागपूर मनपा: ६७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ७२ (१)
इतर राज्ये: १३ (२)
एकूण: ४२००      मृत्यूः २२३

(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत आहेत तसेच मुंबई मनपा कार्यक्षेत्रामध्ये दिनांक १२ एप्रिल २०२० पासूनच्या नवीन निदान झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा