राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ९,९१५ वर; ५९७ नवे रूग्ण, ३२ रूग्णांचा मृत्यू

0
133
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधीत ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ९९१५ झाली आहे. आज २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज राज्यात ३२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४३२ झाली आहे.

आज राज्यात ३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत.  या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.  या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा