राज्यात १३ रेड झोनबाहेर लॉकडाऊन शिथिल, २२ मेपासून लागू होणार नवीन नियमावली!

0
1684
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात कालपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची नियमावली राज्य सरकारने आज मंगळवारी जाहीर केली. राज्यात आता फक्त रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबादसह १३ रेड झोन निश्चित करण्यात आले असून या हे रेडझोन वगळता लॉकडाऊनच्या नियमात काहीअंशी शिथिलता देण्यात आली आहे. हे सर्व नियम आता २२ मे पासून लागू होतील.

राज्यातील १३ रेडझोन असेः मुंबईसह पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, जळगाव, अकोला, अमरावती हे भाग रेड झोनमध्ये असतील. उर्वरित जिल्हे नॉन रेड झोनमध्ये असतील. या महापालिकांव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भाग रेडझोन बाहेर असेल. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येईल.

हेही वाचाः ‘पहाटे ४ वाजता ‘मिर्ची हवन’ करून फडणवीसांनी घेतली होती दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ’

रेड झोनमध्ये या गोष्टींवर निर्बंधः रेड झोनमध्ये टॅक्सी आणि रीक्षा बंद राहणार. टॅक्सी, कॅब, अॅग्रीगेटर सुविधा सुरू होणार नाही. चारचाकी वाहनात एक चालक आणि दोन प्रवाशांनाच परवानगी. दुचाकी वाहनावर एकच व्यक्तीस परवानगी. खासगी बांधकाम साईटस, खासगी कार्यालये, शेती कामांना परवानगी नाही. मात्र रेड झोनमधील शहरी भागात एकलदुकानांना मर्यादित परवानगी देण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सर्वत्र सुरूः या आदेशापूर्वी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती, ती यापुढेही सुरूच राहतील. सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, जीम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, सभागृहे, मेट्रो सेवा आदी सर्व ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

हेही वाचाः ‘मोदींचा मनरेगावर यू-टर्न’: यूपीएच्या अपयशाचे स्मारक संबोधले, त्याचसाठी दिले ४० हजार कोटी!

आरटीओ, घरांची नोंदणी सुरू होणारः आरटीओ आणि घरांची नोंदणी सुरू होणार. हॉटेल, मॉल, प्रार्थना स्थळे बंद राहतील. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंदच राहील. या काळात फक्त देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू राहील.

हेही वाचाः परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्तीसाठी ६ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेचा निर्णय स्थगित

पेपर तपासणीसाठी ५ टक्के कर्मचारीः शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, संस्था बंदच राहतील. ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण सेवा सुरू ठेवण्यास परवानगी. परीक्षा पेपरच्या तपासणीसाठी पाच टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतात.

रेडझोनमध्ये दारूची होम डिलिव्हरीः दारु दुकाने (रेड झोनमध्ये होम डिलिव्हरीला परवानगी), कंटेनमेंट झोनमध्ये बंद राहणार आहेत. अन्य झोनमध्ये मात्र दारू दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या सर्व भागात मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा