विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून

0
19
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपालांना करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

 यापूर्वी ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी निकाल ९५.३० टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.२० टक्क्यांची वाढ आहे असे सांगितले. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत चांगला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. कोरोना परिस्थितीतही प्रयत्नपूर्वक हा निकाल दिलेल्या वेळेत लावल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा