राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह, पण सिल्लोडमध्येच होम क्वारंटाइन!

0
71
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. स्वतः सत्तार यांनीच फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली. विशेष म्हणजे सत्तार कोरोना पॉझिटिव्ह असले तरीही ते सिल्लोडमध्येच होमक्वारंटाइन आहेत.

शंका आली म्हणून राज्यमंत्री सत्तार यांनी आधी अँटिजेन टेस्ट करून घेतली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची आरटीपीसी टेस्ट करण्यात आली. तीही पॉझिटिव्ह आली आहे. ‘थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला परंतु घाबरण्याचे कारण नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून प्रादुर्भाव झाला असेल.परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल. मी होम क्वारंटाइन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी,असे सत्तार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सत्तार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत की तीव्र हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ज्या अर्थी पॉझिटिव्ह येऊनही ते होमक्वारंटाइन आहेत, याचा अर्थ त्यांना अतिशय सौम्य लक्षणे असावीत, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे सत्तार यांचे चिरंजीव उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, स्वीय सहाय्यक, गार्ड, वाहनचालक, प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा