नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः अनलॉक करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत

0
378
संग्रहित छायाचित्र.

अहमदनगरः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता हळूहळू अनलॉक केला जात असतानाच येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्र पूर्णतः अनलॉक करणार, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनेक बाबींना परवानगी देण्यात येत असली तरी सध्या राज्यातील शाळा-महाविद्यालये आणि धार्मिकस्थळे बंदच आहेत. महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू असतानाच बंद असलेल्या अनेक गोष्टी कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा केली जात आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी अहमदनगर येथे बोलताना अनलॉकबद्दल महत्वाचे संकते दिले.

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिकस्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू या, असे टोपे म्हणाले. मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. टोपे यांच्या या वक्तव्यामुळे ३१ ऑक्टोबरनंतर राज्यात लॉकडाऊनची प्रक्रिया जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता दिसू लागली आहे.

 कोरोना विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे आपणाला आता कोरोनासोबतच जगावे लागणार आहे. आपण काही नियम आणि अटी पाळल्याच पाहिजे, असा आग्रहही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना धरला आहे. कोरोना ससंर्गासाठीच्या आरटीपीआर चाचणीचे दर येत्या आठवडाभरापर्यंत आठशे रुपयांपर्यंत आणण्यात येतील, असेही टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा