एमआयडीसी करणार औरंगाबादच्या काही भागात पाणीपुरवठा

0
53

मुंबईऔरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही शहरातील २० ते २५ टक्के विभागांत पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत असून महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे गरजेनुसार शहरातील काही भागात एमआयडीसीद्वारे पाणीपुरवठा करावा, असे निर्देश उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिल्या.

जायकवाडी धरणात मुबलक पाणी असूनही शहराच्या काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराच्या गरजेनुसार पाणीपुरवठा करण्यास शहराची यंत्रणा अपुरी पडत आहे. या प्रश्नावर आज देसाई यांनी महापालिका आयुक्त आस्तिक पांड्ये व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांच्याशी चर्चा केली. शहरातील काही भागांत गरज पडल्यास एमआयडीसीद्वारे पाणी पुरवठा करता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

औरंगाबाद शहरताली गुंठेवारी भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी ती सुविधा अपुरी पडत असल्याचे दिसते. अशा स्थितीत एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना देसाई यांनी केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा