दहावी परीक्षेचा सोमवारचा पेपर रद्द, ३१ मार्चनंतर नवीन तारीख

0
478
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने सोमवारी होणारा इयत्ता दहावी परीक्षेचा पेपर रद्द केला आहे. सोमवार, २३ मार्च रोजी होणाऱ्या या पेपरची पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.

राज्यातील प्राप्त परिस्थिती पाहता सोमवारी होऊ घातलेला इयत्ता दहावी परीक्षेचा पेपर रद्द करण्यात आला आहे. या पेपरची नवीन तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केली आहे. गायकवाड यांनी शुक्रवारीच पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती.  इयत्ता नववी व आकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होतील, असेही त्यांनी सांगितले होते.

आज मुंबईत १० आणि पुण्यात १ असे ११  कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची बाधा दुसऱ्या टप्प्यात असली तरी ती दुसऱ्या टप्प्यातच नियंत्रणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले खरे मात्र, आज झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सोडण्याची पालकांनी गर्दी केली होती आणि गर्दी करू नका असे आवाहन वारंवार करण्यात येऊनही ‘ पाचच मिनिटे’ म्हणत पालक परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरू हटायला तयार नव्हते. पेपर सुरू होताना आणि सुटल्यानंतरही राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर जवळपास असेच चित्र होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा