‘सोशल डिस्टन्सिंग’ ही कोरोनाविरुद्धच्या युद्धात विश्व समूहाची सामरिक नीती बनावीः शरद पवार

0
85
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या संसर्गामुळे हैरान झालेल्या जगाची या संकटातून सुटका करण्यासाठी अनेक पर्याय आणि सूचना पुढे येत असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जागकित समुदायाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची सूचना केली आहे. सामाजिक अंतर ( सोशल डिस्टंन्सिंग) ही कोरोनाविरुद्धच्या युद्धात वैश्विक समूहाची सामरिक नीती बनली पाहिजे, अशी सूचना पवारांनी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग हे जागतिक युद्ध आहे, हे जगाच्या पाठीवरील बहुतांश नेत्यांनी मान्य केले असून त्या दृष्टीने नियोजन आणि आखणीही केली जात असतानाच शरद पवारांची ही सूचना महत्वाची ठरते. जेवढा कमी लोकांशी संपर्क, तेवढा कमी कोरोनाचा संसर्ग हे मुद्देसूद पटवून देणारी स्लाइड शेअर करतानाच शरद पवार यांनी ही सूचना केली आहे.

सामाजिक अंतराचे ( सोशल डिस्टन्सिंग) महत्व पटवून देताना पवारांनी सांगितले की, आता एक व्यक्तीच्या पाच दिवसांत संपर्कामुळे  २.५ लोकांना आणि ३० दिवसांत ४०६ लोकांना  कोरोनाचा संसर्ग होतो. एका व्यक्तीने हाच संपर्क जर ५० टक्के कमी केला तर ५ दिवसांत १.२५ टक्के लोकांना संसर्ग होतो आणि ३० दिवसांत १५ लोकांना संसर्ग होतो. एका व्यक्तीचा हाच संपर्क जर ७५ टक्क्यांनी कमी केला तर पाच दिवसांत ०.६२५ लोकांना संसर्ग होतो आणि ३० दिवसांत हेच प्रमाण अवघ्या २.५ लोकांनाच संसर्ग होतो, असे पवारांनी या स्लाइडमध्ये पटवून दिले आहे. रॉबर्ट ए. जे. सिंगर यांचे हे संशोधन असल्याचे पवारांनी म्हटले आहे. रॉबर्ट ए. जे. सिंगर हे यूसी सॅनदिएगो मेडिकल स्कूलमध्ये असोसिएट प्रोफेसर असून ते स्टेम सेल बायोलॉजिस्ट आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा