औरंगाबादेत नवे १११ कोरोनाबाधित रुग्ण, ८२९ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

0
22
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: दिवाळीनंतर वाढलेली औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या खाली उतरायला तयार नाही. बुधवारी पुन्हा जिल्ह्यात १११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने बुधवारी कोरोनासाठीची नवीन नियमावली जारी केली आहे. १ डिसेंबरपासून तिची अंमलबजावणी होणार असून ज्या ठिकाणी साप्ताहिक १० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतील, त्या ठिकाणी सर्वेक्षण, देखरेख आणि सावधिगिरीच्या उपाययोजना कडक करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, बुधवारी औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील ६८ आणि ग्रामीण भागातील १५ असे ८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत उपचारानंतर ४० हजार ७९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२ हजार ७५७ वर पोहोचला असून आजपर्यंत ८२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद शहरात काल ८९ रुग्ण आढळले. त्यात नगर नाका २, पन्नालाल नगर १, माळीवाडा १, देवळाई रोड १, शिवाजीनगर १, कांचनवाडी १, पडेगाव पोलिस कॉलनी १, गुलमोहर कॉलनी, पडेगाव १, शिवकॉलनी, मयूर पार्क १,  शिवशंकर कॉलनी १, एसबीआय सिडको १, कैसर कॉलनी १, चिंतामणी कॉलनी १, म्हसके गल्ली, पडेगाव १, मनपा परिसर १,  न्यू गणेश नगर १, संकल्प नगर, जाधववाडी २, पारिजात नगर २, एन दोन सिडको १, चिखलठाणा १, शहानूरवाडी २, एमआयटी स्वामी विवेकानंद अकादमी १, एमआयटी शाळा १, बीड बायपास ३, पेशवेनगर १, जवाहर कॉलनी १, एन-तीन सिडको १, हर्सूल, पिसादेवी १, संत ज्ञानेश्वर नगर-सिडको १, द्वारकानगर १, घाटी परिसर १, जाधववाडी १, जालन नगर १, एन-सहा सिडको १, गजानन कॉलनी १, एन-पाच सिडको १, देवळाई चौक १, सर्वेश्वर नगर १, सातारा परिसर २, आकाशवाणी १, गारखेडा परिसर १, अन्य ४१ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पिंपळवाडी, पैठण १, बाजारसावंगी १, लोणी १, पैठण १, भालगाव १, शिक्षानगर, सिल्लोड १, अन्य १६ रुग्ण आहेत.

एका कोरोनाबाधिताचा मृत्यूः घाटीत वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील ७० वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा