राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५, मृतांची संख्या ७२

0
56

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे.  कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५ हजार ७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ११७ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. दरम्यान, आज राज्यात ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी ५ मुंबईत तर २ पुणे येथे तर १ कल्याण डोंबीवलीमधील आहे.
जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबईः ७१४ (मृत्यूः ४५)
पुणेः १६६ (मृत्यूः १०)
पुणे (ग्रामीण)- ०६
पिंपरी चिंचवड मनपाः १७
सांगलीः २६
ठाणे  मनपाः २४  (मृत्यूः ०३)
कल्याण डोंबिवली मनपाः २६  (मृत्यू ०२)
नवी मुंबई मनपाः २९  (मृत्यूः ०२)
मीरा भाईंदरः ०३ (मृत्यूः ०१)
वसई विरार मनपाः १० (मृत्यूः ०२)
पनवेल मनपाः ०६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १),रत्नागिरी, यवतमाळः प्रत्येकी ०३
नागपूरः १९ (मृत्यूः ०१)
अहमदनगर मनपाः १६
अहमदनगर ग्रामीणः ०९
उस्मानाबादः ०४
लातूर मनपाः ०८
औरंगाबाद मनपाः १७ (मृत्यूः ०१)
बुलढाणाः ०८  ( मृत्यूः ०१)
साताराः ०६ (मृत्यूः ०१)
कोल्हापूर मनपाः ०२
उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, अमरावतीः प्रत्येकी १ (मृत्यूः २ जळगाव व अमरावती).

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा