महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ६३५ वर, एकाच दिवशी झाली १४५ नव्या रूग्णांची नोंद

0
376

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजपर्यंत सर्वाधिक वाढ आज नोंदवण्यात आली आहे. आज एकाच दिवशी राज्यात तब्बल १४५ नवीन रूग्णांची नोंद झाली असून त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६३५ वर पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 राज्यात आजपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी ५४ कोरोनाबाधित त्यांच्यावरील उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडे आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे २५ हजार पीपीई कीट्स, दीडहजार व्हेंटिलेटर असून अडीचलाख ९५ मास्क उपलब्ध आहेत. राज्यात लवकरच नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असून आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारकडून उपकरणांचा पुरवठा राज्याला केला जाणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

नागरिकांनी आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढावी. योग्य आहार, व्यायाम,पुरेशी झोप यासोबतच ‘क’जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा. नागरिकांनी स्वयंशीस्त पाळावी घराबाहेर पडू नये.जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा