राज्यातील कोरोनाग्रस्तांची ३,०८१ वर, मुंबईत वाढले १०७ रुग्ण

0
36
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन हजाराचा आकडा पार केला असून आज सकाळी १० वाजेपर्यंत १६५ नवीन कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३,०८१ वर पोहोचली आहे. आज मुंबईत १०७ रुग्ण आढळून आले आहेत.

आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार राज्यात १६५ नवीन कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबईतील १०७, पुण्यातील १९, पुणे- पिंपरी-चिंचवडमधील २, नागपुरातील १०, ठाण्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे.

आज सकाळी १० वाजेपर्यंत नव्याने आढळलेले रुग्ण असेः
अहमदनगर मनपाः ०१
चंद्रपूर मनपाः०१
मालेगाव मनपाः०४
मुंबई मनपाः १०७
नागपूर जिल्हाः ०१
नागपूर मनपाः १०
नवी मुंबई मनपाः ०२
पनवेल मनपाः ०१
पिंपरी-चिंचवड मनपाः  ०४
पुणे मनपाः १९
ठाणेः ०३
ठाणे मनपाः ०९
ठाणे जिल्हाः ०१
वसई-विरार मनपाः ०२
एकूणः १६५

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा