औरंगाबाद: औरंगाबादेत आज ७७ नवीन कोरोना बाधित रूग्णांची भर पडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ हजार ८४६ झाली आहे.तर आणखी तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९५ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार १५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ५९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सिडको एन-७ आयोध्या नगरमध्ये ७, सिडको एन३ मध्ये ६, समता नगरमध्ये ५, रेहमानिया कॉलनीतील ३, बुढीलेनमध्ये ३, विजय नगर- गारखेडा येथे ३, मिल कॉर्नर भागात ३, जवाहर कॉलनीत ३, औरंगपुऱ्यात २, मोगलपुरा भागात २, युनूस कॉलनीत २ तर भारतमाता नगर, इंदिरानगर-न्यू बायजीपुरा, न्यू कॉलनी, रोशन गेट, भावसिंगपुरा, त्रिमूर्ती चौक-जवाहर कॉलनी, बेगमपुरा, चिश्तिया कॉलनी, फाझलपुरा, गांधी नगर, जुना मोंढा,-भवानी नगर, शुभश्री कॉलनी-एन-६, संत ज्ञानेश्वर नगर-एन-९, मयूर नगर-एन-११, सईदा कॉलनी, गणेश कॉलनी, एसटी कॉलनी-फाजलपुरा, रोशन गेट परिसर, भवानी नगर-जुना मोंढा, एन-आठ सिडको, म्हाडा कॉलनी, जुना मोंढा, नॅशनल कॉलनी, राम मंदिर-बारी कॉलनी, विद्यानिकेतन कॉलनी., देवडी बाजार, एन-७ सिडको, एन-१२, आझाद चौक, टी.व्ही. सेंटर एन-११, कैलास नगर, भोईवाडा, चिकलठाणा, किले अर्क, इंदिरा नगर, रोजाबाग या भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. अन्य भागातही ३ रूग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांत ४७ पुरूष आणि ३० महिलांचा समावेश आहे.
घाटीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत नेहरू नगर, कटकट गेट (सदफ कॉलनी) येथील ३०वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा ४ जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. या गरोदर महिलेस २८ मे रोजी घाटीमध्ये दुपारी ४ वाजता भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची प्रसूती झाली व त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यांचा अहवाल २९ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या किडनीचे कार्य अतिशय कमी असल्याने त्यांना डायलिसिस देण्यात आले. परंतु त्यांच्या शरिरातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार चालू असताना ४ जून रोजी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच पाच जून रोजी पहाटे दोन वाजता रहेमानिया कॉलनीतील ३४ वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा, दुपारी १.२० वाजता तक्षशीला नगरातील ४८ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ९५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
आतापर्यंत १ हजार १५४ रूग्ण कोरोनामुक्तः औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) ५, जिल्हा सामान्य रुग्णालयातून १० रूग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाची कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, जिल्हा रूग्णालय, घाटी येथून आतापर्यंत एकूण १ हजार १५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.