लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्हे १४ दिवसांपासून कोरोना संसर्गविरहित!

0
38

नवी दिल्लीः देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असतानाच महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांपासून कोरोनाचा एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

गेल्या १४ दिवसांत देशातील ६१ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आधी या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते.

 दरम्यान, देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या मंगळवारी १८,९८५ वर पोहोचली आहे. सध्या देशातील विविध रूग्णालयांत १५,१२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ६०३ जणांचा आजवर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे ३,२५२ जणांवर उपचार यशस्वी ठरले असून ते बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी एकाच दिवसात तब्बल ७०५ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. आजवरचा हा देशातील सर्वात मोठा आकडा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा