चालू आर्थिक वर्षाला कोणतीही मुदतवाढ नाहीः केंद्र सरकारचा मोठा खुलासा

0
468

नवी दिल्लीः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. आर्थिक वर्षाला मुदतवाढ देण्यात आल्याच्या केवळ अफवाच आहेत, असा मोठा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. केंद्र सरकारच्या या खुलाश्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा ( २०१९-२०) आज शेवटचा दिवस असून नवीन आर्थिक वर्षाला (२०२०-२१) उद्या १ एप्रिलपासून नेहमीप्रमाणेच सुरूवात होणार आहे.

आर्थिक वर्ष वाढवण्यात आल्याच्या खोट्या बातम्या काही माध्यमांकडून चालवण्यात येत आहेत. केंद्र सरकारने भारतीय मुद्रांक अधिनियमात केलेल्या काही दुरूस्त्यांबाबत ३० मार्च रोजी जारी करण्यात आलेली अधिसूचना चुकीच्या पद्धतीन सादर केली जात आहे. परंतु चालू आर्थिक वर्षाचा कोणताही विस्तार करण्यात आलेला नाही, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने ३० मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. ती भारतीय मुद्रांक अधिनियमात करण्यात आलेल्या काही दुरूस्त्यांशी संबंधित आहे.

शेअर बाजार किंवा स्टॉक एक्सजेंच डिपॉझिटरीद्वारे सिक्योरिटी मार्केट इन्स्ट्रूमेंट्सच्या देवाणघेवाणीवर मुद्रांक शुल्काची वसुली करण्यासाठी एक कुशल तंत्र स्थापित करण्याशी संबंधित ही अधिसूचना आहे. हा बदल आधी १ एप्रिल २०२० पासून अंमलात आणण्यात येणार होता. परंतु विद्यमान परिस्थिती लक्षात घेता त्याची अंमलबजावणी १ जुलै २०२० पर्यंत स्थगित करण्यात आली आहे, असा खुलासा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा