३ मे रोजी होणारी ‘NEET’ परीक्षा पुढे ढकलली

0
81
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात उद्भवलेली परिस्थिती आणि त्यामुळे विद्यार्थी-पालकांना करावा लागत असलेला अडचणींचा सामना लक्षात घेता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने( एनटीए) ३ मे रोजी होणारी नीट( यूजी) पुढे ढकलली आहे.

३ मे रोजी होणारी नीट( यूजी) सध्या पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाईल. परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची निश्चित तारीख नंतर जाहीर केली जाईल. ३ मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी २७ एप्रिल रोजी प्रवेशपत्रे जारी करण्यात येणार होती. ती आता १५ एप्रिलनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन जारी केली जातील, असे एनटीएने म्हटले आहे.

 विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेच्या बाबतीत चिंता करू नये. पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मदत करावी. एनटीएकडून विद्यार्थ्यांना वेळेवेळी माहिती दिली जाईल, असे एनटीएने म्हटले आहे.

नीट परीक्षेसाठीबाबतच्या ताज्या माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी ntaneet.nic.in आणि www.nta.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी, असा सल्लाही एनटीएने दिला आहे. परीक्षेच्या बदलाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडीवरही दिली जाणार असल्याचे एनटीएने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा