औरंगाबादेत बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या २५ वर

0
1112
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आज आणखी एका रुग्णाची भर पडली. बायजीपुऱ्यातील एक १७ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या दाट वस्तीच्या भागात कोरोनाचा रूग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नवीन रूग्णामुळे औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २५ वर गेली असून आतापर्यंत कोरोनाने शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

 बायजीपुऱ्यातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला १७ वर्षीय तरूण मुंबईहून १० एप्रिल रोजी औरंगाबादेत परत आला होता.  सोमवारी त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज रात्री त्याच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. दरम्यान, आज घाटी रुग्णालयात आरेफ कॉलनीतील एका ७० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा मृत्यू झाला. ८ एप्रिल रोजी या रुग्णास विशेष कोरोना रुग्णालयातून उपचारासाठी घाटीत पाठवण्यात आले होते. त्याला ३ एप्रिलपासून ताप, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास  होत होता. सोमवारीच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. प्रकृती खालावल्यामुळे त्याला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

आणखी ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठीः दरम्यान, चिकलठाणा येथील विशेष कोरोना रुग्णालयात आज एकूण ७४  जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १८ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. ३०  जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील एक अहवाल निगेटिव्ह आला आहे. ४७  अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एकूण २० रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. देखरेखीखाली ठेवलेल्या एका रूग्णास उपचारांती सुटी देण्यात आल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा