औरंगाबादेत कोरोनाचा बारावा बळी, आसेफिया कॉलनीतील ९५ वर्षीय महिलेचा मृत्यू

0
120
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतच असतानाच दुसरीकडे मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. आसेफिया कॉलनीतील ९५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा आज दुपारी मृत्यू झाला. त्यामुळे  कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या आता १२ झाली आहे.  दरम्यान, आज सकाळच्या सत्रात १७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३७३ झाली आहे.

 आसेफिया कॉलनीतील या महिलेच्या स्वॅबचे नमुने २७ एप्रिल रोजी घेण्यात आले होते. तिचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या महिलेला ह्रदयविकार, फुप्फूस विकाराबरोबरच मानसिक आजारही होते. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचाः फडणवीस, नाक घासून माफी मागाः महाराष्ट्राची मागणी; वंशज म्हणाले, ‘आम्हाला शिकवू नका’

न्यूजटाऊनने सर्वात आधी दिलेली बातमीः देवेंद्र फडणवीसांनी क्रांतिकारी समाजसुधारक शाहू महाराजांना संबोधले ‘सामाजिक कार्यकर्ते’!

शहरात ३५ हॉटस्पॉटः शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असतानाच कोरोना विषाणूचा संसर्ग नव्या वसाहतींमध्येही शिरकाव करू लागला आहे. शहरातील जवळपास ५० वसाहती कोरोना संसर्गाच्या प्रभावाखाली आल्या आहेत. शहरात कोरोना संसर्गाचे तब्बल ३५ हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. आज सकाळी आढळून आलेल्या १७ नवीन कोरोना बाधित रूग्णांमध्ये १० पुरूष आणि ७ महिलांचा समावेश आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या ३७३ वर पोहोचली आहे. तर आसेफिया कॉलनीतील या महिलेच्या मृत्यूमुळे कोरोना बळींची संख्या १२ वर पोहोचली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा