पोलिस दलाला धक्काः मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

0
81
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील आणखी एका कोरोना योद्ध्याचा आज मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाला बळी पडलेल्या पोलिसांची संख्या दोन झाली आहे.

मुंबई पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे यांचा कोरोना संसर्गाशी झुंज देताना मृत्यू झाला. या आधी शनिवारी मुंबईतील कोलावा पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला बळी पडणाऱ्या राज्यातील पोलिसांची संख्या आता दोन झाली आहे.

दरम्यान, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील ९६ पोलिसांना  कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यात १५ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या संसर्गाने आता एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्यामुळे पोलिस दल हादरून गेले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा