औरंगाबादेत आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू, मृतांची संख्या ६ वर

0
149

औरंगाबाद : औरंगाबादेत आज आणखी एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज दुपारी साडेबारा वाजता  उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे औरंगाबादेतील मृतांची संख्या ६ झाली आहे.

लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे या रुग्णास घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांचा स्वॅब घेण्यात आला व त्याच दिवशी त्यांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटीतील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या महिलेच्या मृत्युमुळे औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या ६ झाली आहे.

बायलॅटरल न्युमोनाटिस विथ ऍक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम ड्यू टू कोविड 19  इन केस ऑफ डायबेटिस मलायटस टाइप टू विथ डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेंशन, इस्चेमिक हार्ट डिसिज विथ हायपोथयरॉडिझम हे त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. प्रसिद्धी पत्रकावर घाटीच्या अधिष्ठाता डॉ.येळीकर यांच्यासह माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा