औरंगाबादेत कोरोनाचा ११ वा बळी, ५८ वर्षीय व्यक्तीचा खासगी रूग्णालयात मृत्यू

0
174
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेल्या औरंगाबादेत कोरोना आज ११ वा बळी घेतला. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका ५८ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला.

टाऊन हॉल, भडकलगेट परिसरातील या ५८ वर्षीय व्यक्तीला २७ एप्रिल रोजी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेआठ वाजता या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचे कारण न्यूमोनिया आणि कोरोना असल्याचे कळवण्यात आले आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रात वर्षभर विकास कामांना कात्री; नोकर भरती, बदल्यांवरही बंद

दरम्यान, आज सकाळच्या सत्रात जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २४ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे औरंगाबादेतील कोरोना बाधितांची संख्या ३२१ वर पोहोचली आहे. आढळून आलेल्या रूग्णांत जयभीम नगरात २१, अजब नगरात १, संजय नगरात १, बौद्ध नगरात १ रूग्णाचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा